News - जागतिक महिला दिनानिमित्त भाऊंचे उद्यान येथे
योग शिबीर संपन्न
हेल्दी यू वेलनेस सेंटर व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

जळगाव, दि. ८ (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनानिमित्त हेल्दी यू वेलनेस सेंटर व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊंचे उद्यान- पद्मश्री डॉ. भवरलाल जैन थीम पार्क येथे महिला आरोग्य जागर या विषयांतर्गत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हेल्दी यू वेलनेस सेंटरच्या प्रमुख, योग तज्ज्ञ दिपा लोढा यांनी यावेळी योगाचे धडे दिले.
सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबीरात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली उपस्थिती नोंदविली. तसेच उद्यानात उपस्थित असलेल्या शहरवासियांनीदेखील या योग शिबीराचा लाभ घेतला. दिपा लोढा यांनी सदृढ प्रकृतीसाठी योग अत्यंत आवश्यक असून महिलांनी आरोग्याबाबत जागरुक राहण्याचे आवाहनदेखील यावेळी केले.